Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भारतीय वायुदल कर्मचारीच निघाला पाकिस्तानचा 'खबरी'लढाऊ विमानं, मिसाईलची दिली माहिती

भारतीय वायुदल कर्मचारीच निघाला पाकिस्तानचा 'खबरी'
लढाऊ विमानं, मिसाईलची दिली माहिती

दिब्रुगढ : खरा पंचनामा 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारी तणावपूर्ण स्थिती काही केल्या शमण्याचं नाव घेत नसतानाच आता भारतीय संरक्षण यंत्रणेला सुरुंग लागल्याची खळबळजनक माहिती नुकतीच समोर आली आणि यंत्रणांनाही हादरा बसला.

जिथं भारतीय संकक्षण दलातीलच एका कर्मचाऱ्यानं देशाच्या लष्करासंदर्भातील संवेदनशील माहिती सीमेपलिकडे दिल्याचं स्पष्ट झालं.

राजस्थान गुप्तचर विभागानं नुकत्याच जारी केलेल्या माहितीनुसार आसाममधील भारतीय हवाई दलाच्या तळावर तैनात असलेल्या एका नागरी कर्मचाऱ्याला हेरगिरी केल्याप्रकरणी आणि पाकिस्तानी सूत्रधारांना संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) प्रफुल्ल कुमार यांनी दिलेल्या मागितीनुसार राजस्थान गुप्तचर विभागासह हवाई दल गुप्तचर विभागाच्या संयुक्त कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

जानेवारी 2026 मध्ये जैसलमेरमधून एका संशयिताच्या अटकेनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या सुमित कुमार (36) याची ओळख पटली. जो सध्या आसाममधील दिब्रुगढच्या चाबुआ येथील हवाई दलाच्या तळावर मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) म्हणून कार्यरत होता.

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी 2023 पासूनच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असून, पैशांच्या मोबदल्यात त्यांना गोपनीय माहिती पुरवत होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यानं वायुदलाशी संबंधित बरीच गोपनीय माहिती मिळवत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. आरोपीनं लढाऊ विमानं, क्षेपणास्त्रांची यंत्रणा आणि वायुदल कर्मचाऱ्यांशी संबंधित बरीच संवेदनशील माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीला जयपूरला नेत विविध केंद्रीय यंत्रणांनी त्याची चौकशी केली.

सदर प्रकरणी आरोपीविरोधात ऑफिशिअल सिक्रेट्स अॅक्ट 1923 सह भारती न्यायसंहितेअंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर आता हेरगिरीचं हे जाळं इथवरच आहे की त्याची व्याप्ती आणखी मोठी आहे याचाच तपास यंत्रणा घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.