वरिष्ठांच्या छळाला कंटाळून निवृत्तीच्या दहा दिवस आधीच अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल
बंगळूर : खरा पंचनामा
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित कंटाळून समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पावगड तालुक्यात घडली आहे. पावगड तालुका समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मल्लिकार्जुन (वय ६०) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे.
तीन वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची सेवा येत्या ३१ मार्च रोजी संपणार होती. निवृत्तीपूर्वी अवघ्या काही दिवसांतच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गुढीपाडव्याच्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी मल्लिकार्जुन हे नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर झाले होते. संध्याकाळपर्यंत ते कार्यालयातच थांबले होते. सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर त्यांनी कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. मूळचे पावगड तालुक्यातील गुंडरळहळ्ळी गावचे रहिवासी असलेल्या मल्लिकार्जुन यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
व्हिडिओ संदेशात मल्लिकार्जुन यांनी कुटुंबाचा उल्लेख करताना, 'माझी आई, पत्नी आणि मुलांनी मला खूप साथ दिली. मला अजून त्यांना मदत करायची होती; पण ते शक्य होत नाही, असे भावनिक शब्दांत म्हटल्याचे समजते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.