Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आम्हीच गुप्तचर यंत्रणेच्या आधारावर त्याचा भांडाफोड केला!

आम्हीच गुप्तचर यंत्रणेच्या आधारावर त्याचा भांडाफोड केला!

नागपूर : खरा पंचनामा 

महाराष्ट्रात खबळळ माजवणाऱ्या कथित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणी आता एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून माध्यमांशी संवाद साधताना बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देत या प्रकरणामध्ये नुकत्याच दोन ते तीन महिला पुढे आल्या असून तिथं गुन्हाही नोंदवल्यात आल्याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.

विरोधकांकडून केले जाणारे दावे पाहता, 'हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, आम्हीच गुप्तचर यंत्रणेच्या आधारावर त्याचा भांडाफोड केला असून, आता हळुहळू याची आम्हाला कल्पना होती, की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळं महिला एकदम पुढे येत नाहीत. ज्यामुळं जे पीडित आहेत त्यांना धीर देऊन, त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात काही महिला प्रतिसादही देत आहेत', असं फडणवीस म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर तपासणी आणि कारवाई सुरू असून, डीजी यामध्ये लक्ष घालत असून, नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करताहेत असं सांगत यासंदर्भात कोणत्याही परिस्थितीत कोणतीही हयगय केली जाणार नाही असंही त्यांनी स्ष्टपणे सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असताना, कोणाजवळ काही पुरावा असेल तर तो निश्चित आणून द्यावा असं आवाहन करत कारवाईची हमी दिली.

विनाकारण प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग दिला जात असल्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षावर कटाक्ष टाकला. खरातकडे अनेक लोकं जायचे, विरोधी पक्षाचे कोणकोण गेलेत त्याचे पुरावे देऊ शकतो असं म्हणत आपल्याकडे या प्रकरणाचे सर्वाज जास्त पुरावे आहेत. पण, हे पोलिसांच्या हाती असून मुळात हे पोलिसांचं काम असल्याचं सांगत या प्रकरणी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई सुरू असल्याचं स्पष्ट केलं.

खरातला भेटणाऱ्यांपैकी कोणाचा या प्रकरणात हात असेल तर कारवाई होईल अशी खात्री देत कोणी फक्त भेट घेतलीय आणि कारवाई होणं योग्य नसेल याकडे मुख्यमंत्र्यांचा रोख दिसून आला. यावेळी खरातच्या संस्थानाला पाणीपुरवठ्याच्या वृत्ताचा उलगडा करत या प्रकरणी हा महिलांच्या इभ्रत आणि मर्यादेचा प्रश्न असल्यानं त्याला राजकीय वळण देऊ नये असाच इशारा दिला. आपल्या कथित शक्तींचा वापर करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही, असं ठामपणे सांगत काहीही झालं तरी दोषींना शिक्षा भोगावीच लागेल असं सांगताना सरकार आणि पोलीस शक्य त्या सर्व गोष्टी करतील असं म्हणत कारवाईकडे लक्ष वेधलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.