'सीसीटीव्ही'साठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी
मुंबई : खरा पंचनामा
सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करून प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. माहिती व तंत्रज्ञान विभागाने गृह, नगरविकास विभागाच्या समन्वयातून सीसीटीव्ही यंत्रणेच्या प्रभावी उपयोगासाठी, शहरांमधील खासगी सीसीटीव्ही डेटाचा गुन्हे तपासासाठी उपयोग करणे आणि शूटिंग बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी महामंडळाची निर्मिती करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
विधान भवन येथे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, सीसीटीव्ही यंत्रणेवर आधारित महानेत्रा धोरण आणि महाराष्ट्र अनमॅन्ड सिस्टीम धोरण अंतिम करावे.
सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने सामान्यपणे लागणाऱ्या सेवांसाठी यंत्रणा निर्मिती करावी. भविष्य हे मानवी हस्तक्षेपाशिवाय कृतिशील असणारे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने नवनवीन संशोधन यामध्ये होत आहेत. शासनातही मानवी हस्तक्षेपाशिवाय करता येणे शक्य असलेल्या कामांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.
दिल्लीस्थित राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळात रशिया, ओमान, नायजेरिया, नेपाळ, इंडोनेशिया, टांझानिया या देशांमधील भूदल, नौदल आणि वायुदलातील सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिष्टमंडळाला विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.