बायकोने दिली नवऱ्याला पोटगी अन् झाला घटस्फोट
पुणे : खरा पंचनामा
घटस्फोटानंतर पती आपल्या पत्नीला पोटगी देतो, हे आतापर्यंत आपण चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यातही पाहिलं आहे. अनेकदा ही रक्कम किती असावी यावरून कोर्टात वर्षानुवर्षे खटले चालतात.
पण पुण्यात चक्क 'उफराटी गंगा' पाहायला मिळाली आहे. येथे घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चक्क पत्नीनेच पतीला पोटगीची रक्कम दिली. ऐकून काहीसे विचित्र वाटेल. पण असं प्रत्यक्षात झालेय, ते पण पुण्यात. या प्रकरणाची पुण्यात आणि कायद्याच्या वर्तुळात खळबळ उडाली.
राजा आणि राणी (नावे बदललेली) एकाच गल्लीत राहात असल्याने दोघे प्रेमात पडले अन् दोघांनी पळून जाऊन १९ एप्रिल २०२४ ला कोर्ट मॅरेज केलं. त्यांनतर दोघेही पुण्यात असलेल्या आपापल्या घरी राहू लागले. विशेष विवाह कायद्यानुसार प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामधील तरुणी घरच्यांच्या दबावाला बळी पडली आणि तिने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. मात्र, राज तिला नांदवायला तयार होता. तिला नांदायचे नव्हते. अखेर राणी ने त्याला कारण नसताना कोर्टात खेचल्याने तिनेच त्याला ५० हजार रुपये खटल्याचा खर्च द्यायचा, अशी अट टाकली आणि तिने रक्कम देण्याचे मान्य केल्याने दोघांचा घटस्फोट मंजूर झाला.
अगदी "साथिया" चित्रपटासारखेच हे कथानक, दोघांनाही एकत्रित राहण्याचे धाडस झाले नाही. मुलीने लग्न केल्याचे आईला सांगितले. त्यांच्या लग्नाला विरोध झाला. राणी माहेरच्या विरोधाला तोंड देऊ शकली नाही. जात वेगळी असल्याने तिच्या आईने तरुणीला भडकविले आणि तरुणीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली. तरुणाला नोटीस मिळाली. तरुण तिला नांदावायला तयार होता, पण तिलाच जायचे नव्हते. त्याने न्यायालयातील दोन्ही तारखांना येणे टाळले. त्यांनतर तरुणाने त्याच्या वकिलांच्या यांच्यामार्फत न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. घटस्फोटापूर्वी जोडप्याचे समुपदेशन केले जाते पण या प्रकरणात या गोष्टीचा फायदा झाला नाही आणि अखेर एक रक्कम ठरवून पत्नी ने पतीला पोटगी द्यायचं ठरवलं आणि विषय संपला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.