Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जय पवारांच्यानंतर छगन भुजबळही सरसावले; नेमका 'तो' मुद्दा खटकला...

जय पवारांच्यानंतर छगन भुजबळही सरसावले; नेमका 'तो' मुद्दा खटकला...

मुंबई : खरा पंचनामा 

बारामतीतील अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल एएआयबी संस्थेकडून नुकताच प्रसिध्द करण्यात आला. या अहवालावर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी आक्षेप घेत केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

तसेच त्यांनी विमान कंपनीच्या मालकाचा विमानातील पायलट सीटवर झोपलेल्या अवस्थेतील एक व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली होती.

जय पवार यांनी उघडपणे अहवालावर नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनीही अहवालावर शंका उपस्थित केली आहे. विमान जमिनीवर कोसळण्याआधी झाडाला धडकले होते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. भुजबळ यांनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे.

माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, विमान झाडावर आदळलं असं कुणीही म्हणाले नाही. विमानतळावर अजितदादांच्या स्वागताला शेकडो लोक जमले होते. तिथं कुणीही असं म्हणत नाही की, विमान झाडावर आदळले. त्यामुळे मला आश्चर्च वाटले. तिथे एकही माणूस भेटला नाही की जो असं सांगेल. कुणीतरी पाहिले असते ना. झाडाचंही थोडंफार नुकसान झाले असेल.

भुजबळ यांनी पायलट सीटवर झोपलेल्या विमान कंपनीच्या मालकाच्या कृतीवरही नाराजी व्यक्त केली. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत. त्याने न झोपता पूर्णपणे विमानाचा ताबा घेऊन विमान चालविले पाहिजे. तो मालक जर अशारीतीने झोपला असेल तर तो निष्काळजीपणा आणि मुजोरपणा आहे. त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.