Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दहावीचे बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकाने घेतली सहावीच्या विद्यार्थिनींची मदत!

दहावीचे बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकाने घेतली सहावीच्या विद्यार्थिनींची मदत!

फलटण : खरा पंचनामा 

सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये येथे 10वीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी थेट 6 वीच्या दोन विद्यार्थिनींची मदत घेतल्याचा आरोप एका शिक्षकावर झाला आहे. या प्रकरणामुळे पालक आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिक्षक वैभव शेंडे यांनी मराठी विषयाचे 10वीचे उत्तरपत्रिका तपासताना शाळेतील सहावीतील मधील 2 विद्यार्थिनींना त्यासाठी मदतीला बसवले होते. हा प्रकार शाळेतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी शिक्षकांच्या शेजारी बसून उत्तरपत्रिका तपासत असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दरवर्षी 10वीच्या बोर्ड परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात, त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी ही अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया मानली जाते. उत्तरपत्रिका तपासताना अनुभवी शिक्षकांनी ठरावीक नियमांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात अल्पवयीन विद्यार्थिनींकडून पेपर तपासून घेणे हे शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मानले जात आहे.

या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिर्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी फोनवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र प्रत्यक्ष भेटीत संपूर्ण माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील परीक्षा व्यवस्थेची पारदर्शकता आणि उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंध असलेल्या परीक्षांमध्ये अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला वाव मिळू नये, अशी मागणी पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे. आता शिक्षण विभाग या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.