दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक : सोलापूरच्या दोघांचा समावेश
तीन वाहने जप्त : सांगली एलसीबीची पेठ, सांगलीत कारवाई
सांगली : खरा पंचनामा
ईश्वरपूर, सांगली ग्रामीण, सोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. पेठ, सांगली शहरात एलसीबीच्या पथकांनी कारवाई करत 2.50 लाखांची तीन वाहने जप्त केली. अटक केलेल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
हिरालाल हणमंत भंडारी (वय २१, रा. मट्टी वस्ती, तुळजापूर नाका, ता. जि. सोलापूर), विशाल दिलीप कुंभार (वय ३२, रा. कुंभार वाडा, कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली), अक्षय चंद्रकांत जावीर (वय ३१, रा. भोसे, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दुचाकी चोरणाऱ्यांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक महादेव पोवार यांची दोन पथके तयार केली होते. पथक ईश्वरपूर परिसरात गस्त घालत असताना पथकाला पेठ येथील एका मंदिराजवळ चोरीच्या दोन दुचाकी उभ्या करण्यात आल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे जाऊन भंडारी, कुंभार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
तर सांगली शहरात मार्केट यार्डच्या संरक्षक भिंतीजवळ एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून जावीर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक महादेव पोवार, संजय पाटील, हणमंत लोहार, अतुल माने, उदय सांळुखे, अभिजीत ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सागर लवटे, सागर टिंगरे, अमर नरळे, सतिश माने, विक्रम खोत, गणेश शिंदे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.