Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

थेट पोलीस ठाण्यात शिरून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण !

थेट पोलीस ठाण्यात शिरून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण !

जळगाव : खरा पंचनामा 

येथील वाल्मीकनगर पक्कीचाळ विरुद्ध रिधूरवाड्यात तुंबळ हाणामारी, तलवारी, लाठ्याकाठ्यांसह झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. दोन्ही गट परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले.

दोघांच्या स्वतंत्र तक्रारी घेण्याचे काम सुरू असताना वाळूवाला राहुल ऊर्फ मोगली ठाकरेसह पाच ते सहा दुचाकींवर आलेल्या तरुणांच्या टोळक्याने थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात धडकत डीबी रूममध्ये माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यावर हल्ला चढवून बेदम मारहाण केली.

शनिपेठ पोलिस ठाण्यात एका गटाची ठाणे अंमलदारांकडे तक्रार घेण्याचे काम सुरू होते, तर दुसऱ्या गटातर्फे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांची तक्रार नोंदविण्याचे काम डीबी रूममध्ये सुरू होते. याच वेळेस राहुल ऊर्फ मोगली ठाकरे व पाच ते सहा दुचाकींवर आलेल्या तरुणांच्या टोळक्याने पोलिस ठाण्यात प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबातील दोन महिलांकडे न जाता थेट डीबी रूममध्ये ते धडकले.

तेथे कैलास सोनवणे यांना उद्देशून 'माझ्या बहिणीला शिवीगाळ का केली', असे म्हणत टोळक्याने एकदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीमुळे कल्लोळ माजला. निरीक्षक कावेरी कमलाकर, सहाय्यक निरीक्षक साजिद पिंजारी, डीबीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्यांना आवरण्यास धाव घेतली.

मारहाण करणारे, मार खाणाऱ्यांवर सर्व पोलिसांनी हात साफ केले. मात्र, राहुल ऊर्फ मोगली याला अलगद पकडून बाजूला केले. एकाही पोलिस कर्मचाऱ्याने साधी चापट मारली नसल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

पोलिस ठाण्यात शिरून मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याचे कळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिपेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्यांवर सर्वांत प्रथम त्यांचा राग निघाला. त्यानंतर मारहाण करणाऱ्यांना त्यांनी काठीने चोपून काढले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.