Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीआयडीच्या जाळ्यात विमान कंपनीचे बडे अधिकारी, पुण्यात मालकाचीही कसून चौकशी

सीआयडीच्या जाळ्यात विमान कंपनीचे बडे अधिकारी, पुण्यात मालकाचीही कसून चौकशी

पुणे : खरा पंचनामा 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता. विमान अपघात प्रकरणातील अहवाल समोर आल्यानंतर आता सीआयडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे.

पुणे सीआयडी कार्यालयात व्हीएसआर कंपनीचे मालक, अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी सातत्याने अपघाताच्या मुद्यावर शंका उपस्थित केल्या.

सीआयडीने 'व्हीएसआर व्हेंचर्स' या विमान कंपनीची कसून चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात सीआयडीने कंपनीला एक सविस्तर प्रश्नावली पाठवली असून, संचालक रोहित सिंग यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची दाट शक्यता आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि कंपनीचे कर्मचारी यांची सीआयडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.

सीआयडीने २८ जानेवारी रोजी झालेल्या विमानाचा प्रवास आणि त्याच्या बुकींग प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानाचे भाडे किती होते, बुकींग कोणी केले, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती आणि कंपनीची इतर कायदेशीर कागदपत्रे योग्य होती का, या सर्व बाबींचा तपास आता सीआयडी करणार आहे.

अजित पवारांच्या प्रवासासाठी संबंधित विमानाची निवड कोणी केली? त्या दिवशी विमानासाठी वैमानिकाची नियुक्ती कोणी आणि कोणत्या निकषावर केली? विमानाचे नियमित मेंटेनन्स झाले होते का? अशा विविध मुद्यांवरील प्रश्नावली सीआयडीने व्हीएसआर कंपनीला पाठवली आहे.

विशेष म्हणजे, DGCA ने २४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या अहवालात व्हीएसआर कंपनीच्या कामकाजातील गंभीर दोष समोर आणले होते. या अहवालाचा आधार घेत आता सीआयडीने तपास अधिक तीव्र केला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर सातत्याने शंका उपस्थित केली होती. त्याशिवाय, डीजीसीएने नियुक्त केलेल्या एआयबीच्या अहवालातील त्रुटींवरही बोट ठेवले होते. रोहित पवार यांनी या अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.