पीआयला पोलिस ठाण्यातच पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !
जालना : खरा पंचनामा
वाळू व्यवसायिकावर मासिक 50 हजाराचा हफ्ता देण्यासाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिस निरीक्षकासह पोलिस अंमलदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, अंमलदार रवी जाधव अशी रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई जालना जिल्ह्यातील मंठा पोलिस ठाण्यात केली.
न्यायालायाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीआय मनोज कुमार राठोड याला एक लाख 10 हजार पगार आहे. तर, अंमलदार रवी जाधव याला 60 हजार पगार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू व्यावसायिकाला दरमहा 50 हजाराच्या लाचेची मागणी पीआय राठोड यांच्याकडून करण्यात आली होती. त्याने 10 हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्याने या संदर्भात एसीबीकडे तक्रार केली होती.
त्यानंतर एसीबीने सापळा रचून तक्रारदार पोलिस ठाण्यात 40 हजार देत असताना पीआय राठोड आणि अंमलदार जाधव यांना रंगेहाथ पकडले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.