Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाने केला शिक्षण संस्था चालकाचा खून पलूस येथील गुन्ह्याचा एलसीबीने केला उलगडा

किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाने केला शिक्षण संस्था चालकाचा खून 
पलूस येथील गुन्ह्याचा एलसीबीने केला उलगडा 

सांगली : खरा पंचनामा 

पलूस येथील संस्था चालकाचा खुनाचा उलगडा करण्यात सांगली एलसीबीला यश आले आहे. किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

संजय प्रभाकर परांजपे (वय ६१, रा. सदन अपार्टमेट, परांजपे वाडा, पलुस) असे मृताचे नाव आहे. दि. 18 रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठच्या दरम्यान परांजपे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि पलूसचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांची पथके हल्लेखोरांचा शोध घेत होती.

सुरुवातीला परांजपे यांचा सावकारीचा व्यवसाय, संस्थेतील तसेच इतर व्यवसायातील वादातून खून झाल्याची शक्यता गृहीत धरून तपास केला जात होता. त्यावेळी एलसीबीच्या पथकातील सागर लवटे, विक्रम खोत यांनी तांत्रिक माहिती आणि खबऱ्याद्वारे माहिती मिळवली. त्यात एका मुलाने हा खून केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. 

नंतर पथकाने त्या मुलाच्या घरी जाऊन पालकांसमोर त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये परांजपे यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्यातून त्यांना ढकलून दिल्यावर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातून रक्त वाहत होते. मात्र ते जखमी झाले होते. नंतर हा प्रकार उघडकीस येण्याची भीती वाटल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.