Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईच्या ३ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांची थेट राज्याबाहेर बदली

मुंबईच्या ३ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांची थेट राज्याबाहेर बदली 

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले तीन बड्या अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाने दुसऱ्या राज्यात बदली केली आहे. निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच निष्पक्ष निवडणूक पार पडावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई पोलीस दलात आज मोठी खलबळ उडाली असून शहराची सुरक्षा आणि गुन्हेगारांवर वचक ठेवणारे सर्वात शक्तिशाली तीन अधिकाऱ्यांचे संवेदनशील राज्यांमध्ये बदली केली आहे. यामध्ये गुन्हे शाखेतील सहआयुक्त लक्ष्मी गौतम, सहआयुक्त जय कुमार आणि सहआयुक्त डॉ. आरती सिंग यांचा समावेश आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता. निवडणुका आयोगाने त्यांची संवेदनशील राज्यामध्ये बदली केली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे लक्ष्मी गौतम यांची आसाममध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी 18 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत ते तिथे असतील. दरम्यान जय कुमार यांची पश्चिम बंगालमध्ये या आव्हानात्मक राज्यात बदली करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक दोन टप्प्यांत होत असल्याने ते देखील एप्रिल अखेर पर्यंत बंगालमध्ये असणार आहे. गुप्तचर विभागाच्या प्रमुख डॉक्टर आरती सिंग यांना केरळला पाठवण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्या 18 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत केरळमध्ये असतील.

निवडणुकीदरम्यान वेगवेगळ्या राज्यांमधून पोलीस कर्मचारी तैनात करण्याची एक जुनी परंपरा आहे. यामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले निवडणुकांसाठी अधिक पोलीस दलाची आवश्यकता असते. त्यामुळे मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी इतर राज्यांमधून पोलीस अधिकारी आणि हवालदार आणले जातात. दुसरे म्हणजे ज्या राज्यात निवडणुका होत आहेत, त्या ठिकाणी निष्पक्ष निवडणुका आणि सुनिश्चित करण्यासाठी इतर राज्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.