Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टिळकांचे वंशज शिवसेनेत प्रवेश करणारकाँग्रेस टिळक कुटुंबीयांवर नाराज

टिळकांचे वंशज शिवसेनेत प्रवेश करणार
काँग्रेस टिळक कुटुंबीयांवर नाराज

पुणे : खरा पंचनामा 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली नाही तर पुण्यात आहे. टिळक कुटुंबीयांनी काँग्रेसला अखेर रामराम केला आहे. टिळकांचे वंशज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. "शिवसेनेनं जबाबदारी दिली तर स्वीकारणार" अशी घोषणाच रोहित टिळकांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.

आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांना टिळक पुरस्कार दिलेला तेव्हा आक्षेप घेतला नाही. मग मोदींच्या वेळीच काँग्रेस नेतृत्व का टिळक फॅमिलीवर नाराज झालं? रोहित टिळक यांनी पहिल्यांदाचं या वादावर आपलं मौन सोडलं. टिळक परिवाराने इंदिरा गांधी, प्रणव मुखर्जी यांनाही हा पुरस्कार दिलाय तेही काँग्रेसी होतेच की. मुळात टिळक ट्रस्ट हे राजकीय पक्ष बघून कधीच पुरस्कार देत नाही तर संबंधित सत्कारमूर्तीचे कतृत्व पाहूनच हा टिळक पुरस्कार दिला जातो मग तरीही फक्त मोदी जींच्या वेळेसच का आक्षेप घेतला गेला. लोकमान्य यांच्या काळात काँग्रेस ही एक चळवळ होती पण मात्र, तिकडचं चित्र वेगळं आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून टिळक घराणं काँग्रेससोबत होतं. लोकमान्य टिळक हे मूळचे काँग्रेसीच होते. जयंतराव टिळक हे काँग्रेसचे खासदारही राहिलेत. रोहित टिळक यांनी 2009 आणि 2014 सालची कसबा विधानसभा काँग्रेसमधूनच लढली. रोहित टिळक हे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसही राहिले. पण, पंतप्रधान मोदींना मानाचा टिळक पुरस्कार दिला गेला. तेव्हापासून काँग्रेस हायकमांड आणि टिळक फॅमिलीचा दुरावा वाढत गेला आणि आज अखेर ती स्वातंत्र्य पूर्व काळापासूनती नाळ तुटल्यात जमा झाली आहे.

शिवसेनेकडूनच मला राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा झाली म्हणूनच मी त्यादिवशी मुंबईला फॉर्म भरायलाही गेलो होतो. पण मविआकडून शरद पवार यांचे नाव पुढचं सगळंच थांबलंय पण तरिही भविष्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेजी जी जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्विकारेल, अशी घोषणा रोहित टिळक यांनी झी 24 तासशी बोलताना केली. तसंच काँग्रेसचं काम मी आता थांबलल्याचंही त्यांनी प्रथमच जाहिर करून टाकले. आमच्या संस्थेला लोकमान्य टिळकांचा वारसा असल्याने पुरस्कार देताना आम्ही कधीच पक्षीय अभिनिवेश ठेवला नव्हता पण मध्यंतरी आम्ही पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार काय दिला आणि तेव्हापासून काँग्रेस नेतृत्वाने आमच्याशी अंतर ठेवायला सुरू केलं. खरंतर याबाबत आम्ही थेट काँग्रेस हायकमांड पर्यंत आमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील अनेकदा करून पाहिला. पण तरीही उपयोग झाला नाही म्हणूनच मग नाईलाजास्वत आम्हाला या निर्णयाप्रत यावं लागलं. राज्यसभेला सेनेतर्फे आमचं नाव चर्चेत आल्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी आमच्याशी संपर्कही साधला पण आता माघार नाही हे आमच्या बाजून ठरवून झाल्याने काँग्रेससोबतची टिळक फॅमिलीची नाळ आता कायमची तुटल्यात जमा हे, असंही रोहित टिळक म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.