गहाळ झालेले २० मोबाईल, सोन्याचे दागिने नागरीकांना दिले परत
विश्रामबाग पोलिसांची कामगिरी
सांगली : खरा पंचनामा
विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या सुमारे 20 मोबाईलचा शोध घेऊन तसेच सोन्याचे दागिने असा 3 लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याहस्ते या वस्तू नागरिकांना देण्यात आल्या. विश्रामबाग पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
वरीष्टांच्या सूचनेनुसार विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईल तात्काळ शोध घेणेसाठी विश्रामबाग पोलीस ठाणेकडील सायबर सेल पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांचन, तसेच अमंलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ झालेले मोबाईलची तांत्रिक माहीती प्राप्त करुन शोध घेतला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल गहाळ तक्रारी पैकी नागरीकांचे एकूण ३ लाख रुपये किंमतीचे २० मोबाईल फोन शोधुन काढण्यात पथकाला यश आले. तसेच चोरीच्या गुन्हयातील फिर्यादी गणेश बबन मुळीक यांचे ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मुणिमंगळसुत्र यांचा शोध घेवून मिळालेले मोबाईल व दस्तऐवज खात्री करुन संबंधित नागरीकांना परत देण्यात आले आहेत. आपले मोबाईल व दस्तऐवज परत मिळाल्यामुळे संबंधित नागरीकानी विश्रामबाग पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.