Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना अटक ७ किलो गांजा, दुचाकी असा २.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना अटक 
७ किलो गांजा, दुचाकी असा  २.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

कडेगाव-कडेपूर रस्त्यावर दुचाकीवरून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७ किलो गांजा, दुचाकी असा  २.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

विजय शिवाजी पवार (वय २८, रा. कडेगाव नगरपंचायत पाठीमागे, कडेगाव), अमीर युनूस मुल्ला (वय ३२, रा. मुल्ला वाडा, कडेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अंमली पदार्थांचा साठा, विक्री, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते. पथक कडेगाव तालुक्यात गस्त घालत असताना पथकातील संकेत कानडे यांना दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार कडेगाव-कडेपूर रस्त्यावर गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने तेथे सापळा रचला. पवार आणि मुल्ला तेथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याजवळ सात किलो गांजा सापडला. त्यांना अटक करून गांजा, दुचाकी जप्त करण्यात आली. त्यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, मच्छीद्र बर्डे, अरुण पाटील, उदयसिंह माळी, संदीप गुरव, रणजीत जाधव, शिवाजी शिद, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, अभिजीत माळकर, सुरज थोरात, सुशांत चिले, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.