Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्य बदल्या

तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्य बदल्या

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांचाही समावेश आहे. तर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात २५ वेळा बदली झाली आहे. तर अश्विनी भिडे यांचीही मुंबई आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांची आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले अधिकारी : 
लोकेश चंद्र (IAS:RR:१९९३), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई म्हणून नियुक्ती
अश्विनी भिडे (IAS:RR: १९९५), मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.
विकास चंद्र रस्तोगी (IAS: RR: १९९५), अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली
विनिता वैद्य सिंघल (IAS: RR: १९९६), प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य (R&R), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली
परिमल सिंह (IAS:RR:२००४), प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, यांची सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती
तुकाराम मुंढे (IAS: RR: २००५), सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य (R&R), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली
लहू माळी (IAS:SCS: २००९) यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि., मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
माणिक गुरसळ (IAS: SCS: २००९) यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आलीये.
प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:२०१०), सह आयुक्त, राज्य कर विभाग, मुंबई, यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई येथे नियुक्ती
पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, या पदावर बदली

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.