आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात महावीर जयंती साजरी
सांगली : खरा पंचनामा
सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कार्यालयात भगवान महावीर जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी जैन समाजाला महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत जैन तत्त्वज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ व मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना रावसाहेब पाटील यांनी भगवान महावीरांनी दिलेल्या सत्य, अहिंसा, त्याग आणि अपरिग्रह या मूल्यांची महत्ता अधोरेखित केली. आजच्या समाजाला या शिकवणीची अत्यंत गरज असून, या तत्त्वांचा अंगीकार केल्यास समाज अधिक सुसंस्कृत होईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे दिग्विजय पाटील, प्रकाश बिरजे, भारतीय जनता पार्टी जैनप्रकोष्टचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजे, जैनप्रकोष्टचे सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर पाटील पाटील तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.