पंतप्रधानांच्या मतदारसंघातही LPG चा तुटवडा
सिलिंडर मिळत नसल्याने अन्नपूर्णा मंदिरात 35 वर्षांपासून सुरू असलेले अन्नछत्र बंद
वाराणसी : खरा पंचनामा
देशात LPG चा तुटवडा नाही असा दावा जरी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील मंदिरांनाही LPG च्या तुटवड्याची झळ बसू लागली आहे. वाराणसीतील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात गेल्या 35 वर्षांपासून निरंतर सुरू असलेले अन्नछत्र सध्या गॅसअभावी बंद करण्यात आले आहे.
वाराणसीतील अन्नपूर्ण देवी मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. गेल्या 35 वर्षांपासून या मंदिरात अन्नछत्र सुरू असून ते कधीच बंद झाले नव्हते. या मंदिरातील अन्नछत्रात दररोज पाच ते सहा हजार भाविक जेवतात अशी नोंद आहे. मात्र आता LPG चा तुटवडा असल्याने या मंदिरातील अन्नछत्र बंद करण्यात आले आहे.
"एकही गॅस सिलिंडर सध्या मिळत नाहीये त्यामुळे आम्हाला अन्न छत्र बंद करावे लागत आहे. मात्र आम्ही यासाठी पर्याय शोधत आहोत", असे या मंदिराच्या प्रशासनाने सांगितले.
आम्ही नेहमी इथे जेवायला येतो मात्र इतक्या वर्षात पहिल्यांदा असं झालंय की माता अन्नपूर्णाच्या भंडारातच जेवण नाही बनले, अशी प्रतिक्रीया एका पंडित तरुणाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.