Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईच्या महापौर पुन्हा वादाच्या भोवऱ्यातरितू तावडे यांचा लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास

मुंबईच्या महापौर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
रितू तावडे यांचा लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईच्या महापौर रितू तावडे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्या आहेत. मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका केली जात आहे. यापूर्वी घड्याळ्यामुळे वादात अडकलेल्या रितू तावडे आता गाडीवर दिव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत.

केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. त्यानंतर देखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या गाडीला लावलेले लाल-निळे दिवे पाहून सर्वांनी आश्यर्च व्यक्त केले आहे. तसेच नियम फक्त इतर लोकांसाठी आहेत का असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील दिव्यांमुळे व्हीआयपी ट्रीटमेंट पुन्हा सुरु झाली असल्याची टीका केली जात आहे. मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआर ला दिलेल्या सूचनेला हरताल फसला. आता तर केंद्रसरकार यांनी दिलेला निर्णयाला हरताल फसला आहे. व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी केंद्र सरकार यांनी संपवली होती पण मुंबईच्या महापौरा यांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का ?? असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वैगरे नव्हता. पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यामध्ये महापौरांचा काहीच दोष नाहीये. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला नियम आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असे वाटतय की त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही." अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.