भोंदू अशोक खरातवर 15 वा गुन्हा दाखल
नाशिक : खरा पंचनामा
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं.
अलीकडेच त्याचा नाशिकच्या सिन्नरमधील एका बँकेसंबंधी नवा करारनामा उघड झाला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय.
भोंदूबाबा अशोक खरातचे समता पतसंस्थेतच नव्हे, तर इतर अनेक पतसंस्थांमध्ये अवैध खाते होते. नाशिकच्या सिन्नरमध्येही जगदंबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत त्याची ३२ बनावट खाती होती. या खात्यांमधून ५७ लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली होती. खरातसह संचालक मंडळावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरातच्या एकामागे एक उघड होणाऱ्या कारनाम्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.