Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अनैसर्गिक संबंधांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादासततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

अनैसर्गिक संबंधांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा
सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

हिंगोली : खरा पंचनामा 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एका तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हि आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या धक्कादायक घटनेनं पोलीस  विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्यामाहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या तरुणाची नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मैत्री झाली होती. त्यातूनपुढे आत्महत्या करणाऱ्या तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी लिपिक अभिषेक सातपुते याने तगादा लावला. मात्रसततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हतबलहोऊन रुमालाने गळफास घेत आत्महत्या केलीय. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.