Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 403 पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती कोल्हापूरचे तीन, सांगलीचे सहा, साताऱ्याचे सात तर सोलापूर ग्रामीणच्या दहा जणांचा समावेश

राज्यातील 403 पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती 
कोल्हापूरचे तीन, सांगलीचे सहा, साताऱ्याचे सात तर सोलापूर ग्रामीणच्या दहा जणांचा समावेश 

मुंबई : खरा पंचनामा 

विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या व पोलीस उप निरीक्षक गट-ब (अराजपत्रीत) या पदावर पदोन्नती देण्याबाबतच्या सन २०२५-२०२६ च्या निवडसूचीवरील पात्र अंमलदारांना स्थानापन्न २५ टक्के कोट्यातील रिक्त पदात पदोन्नती देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना)
सुप्रिया पाटील यादव यांच्या सहीने जारी करण्यात आलेल्या आदेशात राज्यातील 403 अंमलदारांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूरचे तीन, सांगलीचे सहा, साताऱ्याचे सात तर सोलापूर ग्रामीणच्या दहा जणांचा समावेश आहे.

जिल्हा निहाय पदोन्नती मिळालेले अंमलदार :
कोल्हापूर : सुहास पोवार, संभाजी भोसले, मुसा सुतार 
सांगली : संजय पवार, चंद्रकांत वाघ, राजेंद्र पाटील, बळीराम पवार, माया चव्हाण, विकास पाटणकर 
सोलापूर ग्रामीण : हनुमंत जरे, राजेंद्र भापकर, मल्लीनाथ चडचणकर, सुधीर गुळमे, संतोष जगताप, राजकुमार यावलकर, तैबुद्दीन मुंडे, संजय बगाडे, राजेंद्र जावळे, दत्तात्रय घंटे 
सातारा : रतन कांबळे, विश्वनाथ संकपाळ, सत्यवान बसवन्त, रोशन वीरकर, नितीन राजेमहाडिक, दीपक क्षीरसागर, संदीप माने

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.