Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोर्टात हात जोडणाऱ्या खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी

कोर्टात हात जोडणाऱ्या खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : खरा पंचनामा 

भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका पीडित महिलेचे लैंगिक शोषण करून तिचा गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान त्याला त्याची बाजू मांडण्यास सांगितले होते. यावर, मला काहीही सांगायचे नाही असे म्हणत अशोक खरातने न्यायाधीशांसमोर हात जोडल्याचे समोर आले. यावेळी सरकारी वकिलांनी सांगितले की, 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत अनेक बाजू समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आले.

सुरक्षेच्या कारणास्तव भोंदूबाबा अशोक खरातला व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयासमोर आणले. यावेळी, सुनावणीला सुरुवात होताच खरातची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावेळी सुनावणीदरम्यान तपासा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलेने 12 हजार रुपयात एक औषध खरेदी केले. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून आणि मरणाची भीती घालून अत्याचार केल्याचे पीडित महिलेने सांगितल्याचे समोर आले आहे. तसेच यावेळी पीडितेकडून खरातने आधार कार्ड, पॅन कार्ड घेतले होते. हे कशासाठी घेतले होते? याद्वारे काही मालमत्ता खरेदी केली होती का? याचा शोध घ्यायचा आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, आरोपी अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचेदेखील सांगितले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.