भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, पोलिस पथक घटनास्थळी दाखल
चंदीगड : खरा पंचनामा
चंदीगडमधून मोठी बातमी समोर आली आहे. आज दुपारी चंदीगडच्या सेक्टर 37 मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटानंतर भाजप कार्यालयाबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. घटनास्थळावरून स्फोटानंतरचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, चंदीगडमधील भाजपच्या कार्यालयाबाहेप पाच वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्फोट सेक्टर-37 मधील भाजपा कार्यालयाबाहेर झाला असून त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याची माहितीही समोर आली आहे. या स्फोटामुळे आसपास उभ्या असलेल्या वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून या स्फोटाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका होंडा एक्टिवा बाईकमध्ये झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेत सध्या तरी कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
स्फोटानंतर बॉम्ब स्क्वॉडची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. फॉरेन्सिक पथकाकडूनही तपास सुरू आहे. मागील काही दिवसांपासून चंदीगडमध्ये अशा प्रकारे अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याने ही बाब चिंतेची ठरत आहे. अलीकडेच चंदीगडमध्ये उघडपणे खूनाची घटना घडली होती, तसेच पंजाब विद्यापीठात गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.