नांदेडमध्ये 70 तासांत पाच हत्येच्या घटना
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नांदेड : खरा पंचनामा
नांदेड शहरात कायदा आणि पोलिसांचा धाक उरला नाहीये का? असा प्रश्न आता नंदेडकरांना भेडसावू लागला आहे. कारण शहरातील भीतीच्या दहशतीची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या पाच हत्येच्या घटना घडल्या आहे.
नांदेड शहरात अवघ्या 70 तासांच्या कालावधीत शहरात तब्बल पाच खुनाच्या घटना घडल्या आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोबतच गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रक्ताच्या खेळामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
अशातचआज (6 एप्रिल रोजी) पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर काल एका तरुणाचा आणि आज पहाटे पाचवा खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, सततच्या या रक्तरंजित घटनांमुळे नांदेडकरांमध्ये प्रचंड संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी आक्रमक मागणी केली असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
नांदेडच्या श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहाटे 6 ते 6.30 च्या सुमारास सोनू कल्याणकर याच्यावर धारदार शस्त्र आणि वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही घटना झालेली आहे. तीन दिवसांमध्ये हा पाचवा खून आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.