शरद पवारांनी तिसऱ्यांदा घेतली राज्यसभेच्या खासदरकीची शपथ
पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत
नवी दिल्ली : खरा पंचनामा
शरद पवार यांनी तिसऱ्यांदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. नुकतीच त्यांनी संसदीय कारकिर्दीची ५९ वर्षे पूर्ण केली आहेत. राज्यसभेत शरद पवार यांच्यासह रामदास आठवले यांनीही शपथ घेतली.
राज्यातील दोन आणि केंद्रातील दोन अशा चारही सभागृहाचं सदस्यपद शरद पवार यांनी भूषवलंय. १९६७ मध्ये शरद पवार यांनी आमदारकीची निवडणूक पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. तसंच केंद्रातही मंत्रीपद भूषवलंय. शरद पवार १९७८मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९८४ ला त्यांनी बारामतीतून खासदारकीची निवडणूक लढवली. पण १९८५ ला पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरले.
१९९० पर्यंत शरद पवार बारामतीचे आमदार होते. सलग सहा वेळा ते आमदार झाले होते. त्यानंतर १९९१ पासून २०१४ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते. २०१४ पासून ते राज्यसभा खासदार आहेत. गेल्या ६० वर्षात शरद पवार हे विधानसभेपासून राज्यसभेपर्यंत कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य आहेतच. अपवाद केवळ १९९८ आणि १९९९ या वर्षाचा. त्यावेळी लोकसभा बरखास्त झाली होती. आता पुन्हा शरद पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतलीय. आता ते २०३२ पर्यंत खासदार असणार आहेत.
संसदेत आता पवार कुटुंबाच्या तीन पिढ्यातील ३ सदस्य दिसणार आहेत. सुप्रिया सुळे या बारामतीतून खासदार आहेत. तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.