खाशाबा जाधव यांना तब्बल 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळणार
हायकोर्टाच्या कोल्हापूर बेंचचा केंद्र सरकारला झटका
कोल्हापूर : खरा पंचनामा
'पॉकेट डायनॅमो' या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा प्रवास कोणत्याही कुस्तीपट्टूसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. अशातच खाशाबा जाधवांच्या मुलाच्या लढल्याला यश मिळताना दिसत आहे. 1952 साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं.
भारताचे पहिले ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळण्याची प्रतिक्षा अखेर संपली म्हणावी लागेल. पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे कुस्तीत पदक मिळवले होते. तेव्हा केंद्र सरकारने 4 मे पूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. तब्बल 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कुस्तीवीर खाशाबा जाधव फाऊंडेशन याचिका दाखल केली होती. याबाबत विविध खासदारांनी देखील संसदेत मुद्दा उपस्थित केला होता. या मागणीला यश आले असून पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नितीच्या मनात काय असतं, हे कुणाला कधी कळणार नाही. त्यांना जिवंतपणी हा पुरस्कार देता आला असता. त्यांचा मुलगा म्हणून मला वाटलं की खाशाबा जाधव यांना न्याय मिळला पाहिजे. मी गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय. अनेक नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलं. पैलवान लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. याचिका दाखल केल्यानंतर आता सकारात्मक न्याय मिळाला. समाजातील अनेक लोकांना यातून संबोध घेता येईल की, लढता आलं पाहिजे. मला आता आशा आहे की, भारत सरकार सकारात्मक निर्णय घेईल. विलंब न लावता सरकारने याचा निकाल लागावा, अशी आशा देखील रणजीत जाधव यांनी व्यक्त केली आहे.
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 'पद्मविभूषण'ने सन्मान व्हावा, म्हणून सरकार दरबारी दिलेली फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती काही वर्षांपूर्वी समोर आली होती. 2017 मध्ये हा प्रकार समोर आला होता. महाराष्ट्र सरकारने त्यावेळी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करताना फाईल गहाळ झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रामदास तडस यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली होती. तर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी पंतप्रधानांकडे पद्मविभूषण पुरस्कारासाठी त्वरित शिफारस करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वसान पूर्ण न झाल्याने रणजित यांनी कोर्टाची पायरी चढली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.