महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला राज्यातील 800 अधिकारी, अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
सांगलीच्या अपर अधीक्षक कल्पना बारवकर, निरीक्षक किरण चौगले यांचा समावेश
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात उद्या साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या राज्यातील 800 अधिकारी, अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सांगलीच्या अपर अधीक्षक कल्पना बारवकर, निरीक्षक किरण चौगले तसेच सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, कोल्हापूर येथील (ना.ह.सं.) अधीक्षक ज्योती क्षीरसागर यांचा समावेश आहे. सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकारी, अंमलदारांचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी अभिनंदन केले आहे.
सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यामध्ये चार उप महानिरीक्षक, 10 उपायुक्त, अपर अधीक्षक, 26 उपविभागीय अधिकारी, 64 निरीक्षक, 27 सहायक निरीक्षक, 74 उपनिरीक्षक, 150 सहायक उपनिरीक्षक, 317 हवालदार, 22 नाईक, 111शिपाई यांचा समावेश आहे.
सन्मानचिन्ह जाहीर झालेले कोल्हापूर परीक्षेत्रातील अधिकारी, अंमलदार :
सांगली : अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निरीक्षक किरण चौगले, हवालदार सागर टिंगरे, आमिरशा फकीर, मारुफहुसेन चमनशेख, भावना सूतगुंडे.
कोल्हापूर : कृष्णा पाटील, रामचंद्र कोळी, स्वप्नील साळवी, दीपक ढंग, संदीप म्हसवेकर, वसंत पिंगळे, अमरसिंह वासुदेव, सतीश जंगम, संजय पाटील, राजेश पाटील, शेखर सवतेकर, तानाजी चौगुले, वदंना भोईटे.
सातारा : तुषार भोसले, स्वप्नील शिंदे, संजय साळुंखे, रौफ इनामदार, गजानन तोडकर, राहुल खाडे, नंदकिशोर कदम, इसाक मुलाणी.
पुणे ग्रामीण : राहुल पवार, विनोद भोकरे, सुहास पवार, महेश बनकर, दीपाली कहडणे, कुलदीप संकपाळ, सचिन लोखंडे.
सोलापूर ग्रामीण : मंजुळा धोत्रे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.