Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाविकास आघाडी फुटली? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

महाविकास आघाडी फुटली? 
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई : खरा पंचनामा 

विधानपरिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसनं ही जागा स्वतः उद्धव ठाकरेंनी लढवावी, असा आग्रह धरला होता. यासाठी मातोश्रीवर काँग्रेसच्या फेऱ्याही झाल्या होत्या. मात्र अर्ज भरण्याची अंतिम तारीख एका दिवसावर आली असताना आदित्य ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाकडून थेट अंबादास दानवेंचं नाव जाहीर केलं. अर्थातच त्यांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र हे नाव जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली. दानवेंच्या नावाची कुठलीच चर्चा असताना थेट उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करत विधानपरिषदेत आपला उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले.

विशेष म्हणजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींशी विधानपरिषदेवरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेसमध्येही अनेक नेत्यांची नावं विधानपरिषदेसाठी चर्चेत होती. त्यात ठाकरेसेनेनं अंबादास दानवेंची घोषणा केल्यानं मविआतील समन्वयाचा अभाव उघड झालाय.

दुसरीकडे राष्ट्रवादीने महाविकास आघाडी एकत्र बसून यावर निर्णय घेईल, असं विधान केलयं. मात्र, काँग्रेसनेही उमेदवार देण्याचे संकेत दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार की दानवेच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीत उभी फूट पडणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.