Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस कोठडीतील महिलेकडे शरीरसुखाची मागणीASI राजेश जाधववर गुन्हा, वरिष्ठांनी केलं निलंबित

पोलीस कोठडीतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी
ASI राजेश जाधववर गुन्हा, वरिष्ठांनी केलं निलंबित 

अकोला : खरा पंचनामा 

पोलीस दलाची मान शरमेने खाली घालणारी धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे, कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने 'शरीरसुखाची' मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोकरी लावण्याच्या बहाण्याने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित महिलेला सायबर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

या कोठडी दरम्यान महिलेला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. कोठडीत असताना तेथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली, असा खळबळजनक दावा आरोपी महिलेने लेडी पोलीस कर्मचाऱ्याकडे केला.

ही बाब संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. आपल्याच विभागातील एका अधिकाऱ्याने असे नीच कृत्य केल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा पारा चढला. माहिती मिळताच वरिष्ठांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि तेथील संबंधित पोलीस एएसआय राजेश जाधवची चांगलीच कानउघडणी करत त्याला सर्वांसमोर झापले. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महिलेने केलेले शरीरसुखाच्या मागणीचे आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत. मात्र ते सूडबुद्धीने केले आहेत की यात खरोखरच तथ्य आहे, याचा तपास करणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस कोठडीत महिला सुरक्षित नसल्याचा संदेश गेल्यास खात्याची मोठी बदनामी होऊ शकते, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.