Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एकनाथ शिंदे तुम्ही साताऱ्याचे आहात, तुमच्यासमोर ताराराणींचा..' जैन मुनी निलेश चंद्र यांनी सांगितला मराठे, महाराणी ताराराणी यांचा संपूर्ण इतिहास

'एकनाथ शिंदे तुम्ही साताऱ्याचे आहात, तुमच्यासमोर ताराराणींचा..' 
जैन मुनी निलेश चंद्र यांनी सांगितला मराठे, महाराणी ताराराणी यांचा संपूर्ण इतिहास 

मुंबई : खरा पंचनामा 

"जैन मुनी नयन पद्मसागर यांनी एक वादग्रस्त विधान केलय. ताराराणी जैन होत्या. ताराराणी जैन नव्हत्या. त्या मराठा होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्र तळ बीडमध्ये झालाय. ही मीहिती जैन समाजाला असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध लढली.

त्या युद्धात सरसेनापती हंबीरराव मोहित हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती होते. सरसेनापती हंबीररावे मोहिते यांच्या कुटुंबात एका पुत्रीचा जन्म झाला. तिचा नाव ठेवलं ताराबाई. 1675 मध्ये जन्म झाला. 10 ते 12 या वयात ताराबाईंचा विवाह राजाराम यांच्यासोबत झाला. राजाराम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र" नयन पद्मसागर यांची वक्तव्य खोडून काढताना जैन मुनी निलेश चंद्र यांनी हा इतिहास सांगितला. "राजाराम महाराजांनी चार विवाह केले होते. ताराबाई त्यांची दुसऱ्या नंबरची धर्म पत्नी आहे. हा आहे ताराबाईंचा इतिहास. राजाराम महाराज यांचा छोट्या वयात स्वर्गवास झाला. चारही बाजूंनी मोगलांनी मराठा साम्राज्याला घेरलं होतं" असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले.

"चारही बाजूंनी मोगलांनी मराठा साम्राज्याला घेरलं होतं. चिंतेचा विषय होता. मराठा साम्राज्याला वाचवायचं कसं? ताराबाई सरसेनापती हंबीरराव मोहितयांची पुत्री होती. युद्धकला आणि सनातन धर्म लहानपणापासून अंगी होता. राजाराम यांच्या मृत्यूनंतर ताराराणी मोगलांशी लढल्या. दुर्गा बनून मुघलांवर तुटून पडल्या. महाराष्ट्राच्या जनतेने ताराबाईंना ताराराणी बनवलं. ही ताराबाईंचा इतिहास आहे" असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी सांगितलं.

"नयन पद्मसागर यांनी सर्वप्रथम इतिहास वाचला पाहिजे. ताराराणी कोण होत्या?. ताराबाई छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. त्याचं नाव ठेवलं ताराबाई. त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी झालं. त्यांनी भरपूर सारी युद्ध लढली. म्हणून जनतेने त्यांना ताराराणीची उपाधी दिली. ताराबाई यांचा जन्म 1675 साली तळ बीड मध्ये झाला. त्यांचा मृत्यू 1761 साली सातार जिल्ह्यात झाला. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्याचा मी विरोध करतो. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी याचा विरोध केला पाहिजे" असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले.

"नयन पद्मसागर वादग्रस्त बोलतो. मराठी-मारवाडी यांच्यात भांडण लावतो. शाकाहारी-मांसाहारी याबद्दल बोलतो. मी जैन समाजाला आवाहन करतो 52 कबुतर खाने बंद झाले, हे बंद होण्यामागचं कारण नयन पद्मसागर आहे. त्यांना सहकार्य करणारे मंत्री आहेत. महावीर जयंतीच्या दिवशी एकनाथ शिंदे ठाणे टेंभीनाका येथे येतात. एकनाथ शिंदे साहेब त्या महावीर जंयतीच्या कार्यक्रमात होते. तिथे पद्मसागर यांनी हे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही साताऱ्याचे आहात. ताराराणींचा अपमान करणाऱ्या अशी जैन मुनीवर काय कारवाई करणार याचा तुम्ही विचार केला पाहिजे" असं निलेश चंद्र म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.