'अजितदादांचे फक्त नावच पुरेसं, घातकी तटकरे-पटेलची...'
बारामती : खरा पंचनामा
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. आज अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख आहे. या निवडणुकीमध्ये रविवारी सायंकाळी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने अॅड. आकाश मोरेंना मैदानात उतरवलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात धनगर समाजाचा चेहरा म्हणून मोरे यांना संधी देण्यात आली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर उमेदवार जाहीर करत अॅड. आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात धनगर समाजाचा चेहरा म्हणून मोरे यांना संधी देण्यात आली. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल लागणार आहे. सुनेत्रा पवार बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू असतानाही काँग्रेसने उमेदवार दिला असून अनेक अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे असे मिळून या लढतीत एकूण 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याने ही निवडणूक रंजक होणार आहे.
एकीकडे या घडामोडी सुरु असतानाच आज सुनेत्रा पवारांचे समर्थक अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करतील असं बोललं जात आहे. अशातच आज सकाळपासूनच बारामतीमध्ये प्रशासकीय भवनात लावण्यात आलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा दिसून येत आहे. या बॅनरमधून पक्षाचेच ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत टीका करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच बारामती अज्ञातांनी लावलेल्या एक बॅनर झळकला आहे. हा बॅनर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात लावण्यात आला आहे. "अजितदादांचे फक्त नावच पुरेसं आहे!" असं ठसठशीत अक्षरात लिहिण्यात आलं आहे. याच बॅनरवर पुढील ओळीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा घातकी असा उल्लेख करण्यात आला आहे. "घतकी तटकरे-पटेलची गरज नाही," असं या बॅनरवरील शेवटच्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे. हा बॅनर लावणाऱ्यांनी आपली ओळख, "समस्त दादा प्रेमी" अशी सांगण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काल रात्रीपासूनच बारामतीत तळ ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी सुनील तटकरे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र ते यशस्वी झाले नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.