Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हजारो कोटींची टेंडर्स मॅनेज, सर्वांचे कमिशनही 'फिक्स'नाशिकमधील कुंभमेळा टेंडर्स बाबत लाचखोर अधिकाऱ्याचे धक्कादायक दावे

हजारो कोटींची टेंडर्स मॅनेज, सर्वांचे कमिशनही 'फिक्स'
नाशिकमधील कुंभमेळा टेंडर्स बाबत लाचखोर अधिकाऱ्याचे धक्कादायक दावे

मुंबई : खरा पंचनामा 

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठीच्या १ हजार २१ प्रकारच्या कामांचे टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहेत आणि त्यातून आपल्याला कोट्यवधींचे कमिशन मिळणार आहे, असा दावा मंत्रालयात लाच घेताना अटक करण्यात आलेला कक्ष अधिकारी विलास लाड याच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. निधी मंजूर करण्यासाठी मंत्रालयात ६ लाख ३७ हजारांची लाच घेताना लाड याला अटक करण्यात आली. ही बाब आधीच चर्चेत असताना आता त्याच्या ऑडिओ क्लिपने खळबळ माजवली आहे.

विलास लाड याला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो समोरच्या व्यक्तीला नाशिकच्या कुंभमेळ्यातील टेंडर आणि त्यातील कमिशनबाबत माहिती देताना दिसतोय आणि त्यातून आपल्याला कोट्यवधींचे कमिशन मिळणार असल्याचा दावा करताना दिसतो आहे. संशयित आरोपी आरोपी विलास लाड सध्या कारावासात असल्याने त्याचे फोन संभाषणात केलेले दावे खरे की खोटे याच्या स्पष्टतेबाबत संधीग्तता आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारांकडून १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी काही हजार कोटींचा निधी प्रत्यक्षात आला आहे. त्यामध्ये आपला कोटा ५०० कोटींचा असल्याचा दावा लाड याने केला आहे. यामध्ये आपण स्वतः ७०० तंबूंचे तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडरही घेतल्याचा दावा त्याने केला आहे. या कुंभमेळ्यामध्ये नाश्ता आणि जेवणाचे टेंडर १८ कोटींचं असून ते आपल्याला मिळाल्याचा दावा विलास लाडने केल्याचे कथित ऑडिओ क्लिपमध्ये नमूद करण्यात आले आहे. कुंभमेळा केवळ चाळीस दिवसांचा असून त्यामध्ये एवढा खर्च येत नाही, यातून मोठं कमिशन मिळणार असल्याचा दावा विलास लाडने केला आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी टेंडर मॅनेज करून झाली आहेत. त्यामध्ये छोट्या अधिकाऱ्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची टक्केवारी फिक्स झाल्याचा दावा विलास लाडने ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. ई टॉयलेट पासून साफसफाईची हजारो कामे आहेत, त्यातून लाखो रुपये कमावता येतील असा दावा त्याने केला आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांना ही टेंडर देऊयात. असा विश्वास विलास लाडने समोरच्या व्यक्तीला दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.