Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही'

'अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही'

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाचे युवा नेतृत्व आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच पक्षाची सर्वोच्च जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या (UBT) कार्याध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते. हा निर्णय झाल्यास ठाकरे गटाची धूरा संपूर्णपणे आदित्य ठाकरेंच्या हाती जाऊ शकते. तसेच पक्षातील सर्व निर्णयांचा अधिकार आदित्य ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे आदित्य ठाकरे याचं पक्षातील वजन आणि अधिकार दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.

येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याच मुहूर्तावर आदित्य ठाकरेंच्या पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी लवकरच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊ शकते. या बैठकीत रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाईल. 2010 मध्ये युवासेनेच्या स्थापनेपासून आदित्य ठाकरे संघटनेत सक्रिय आहेत, मात्र 'कार्याध्यक्ष' पद हे त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठे वळण ठरू शकते. ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांच्या मते, ही प्रक्रिया 2003 साली महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीसारखीच असेल.

त्यावेळी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती, अगदी त्याच धर्तीवर आता आदित्य ठाकरेंकडे सूत्रे सोपवण्याचा विचार सुरू आहे. उद्धव ठाकरेंकडून पक्षाची धुरा हळूहळू पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. 

एकीकडे राजकीय वर्तुळात हा विषय प्रचंड चर्चेत असताना आणि विविध राजकीय पक्षांचे नेते त्यावर प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी मात्र या बातमीत काहीही तथ्य नाही असे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये "आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही", असे स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.