Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वेश्या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या महिलेला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड

वेश्या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या महिलेला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड

सांगली : खरा पंचनामा 

वेश्या व्यवसायाच्या उत्पन्नावर उपजीविका चालविल्याने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा कलम ४ अन्वये दाळेषी धरुन ०१ (एक) वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ५, श्रीमती. एम. एम. पाटील-साठे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती उज्वला करवते यांनी काम पाहिले.

सरोजा चंद्रशेखर कांबळे उर्फ सरोजा कांळीगप्पा पुजारी (वय ४६, रा. प्रेमनगर, उत्तमनगर झोपडपट्टी, मिरज) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. दि. १८ सप्टेंबर २०१५ रोजी सायंकाळी साडेचारचे सुमारास फ्रीडम फर्म संस्था वानवडी, पुणे यांचेकडील समाजसेवक व पोलीस यांनी मिरज येथील प्रेमनगर, उत्तमनगर झोपडपट्टी, येथे छापा टाकला असता आरोपी हि आदर्श रामनगर, बुन्दी, राजस्थान येथील पीडित अल्पवयीन मुलगी हिचे करवी वेश्या व्यवसाय करवून उपजीविका करीत होती. पंटर गि-हाईकाकडून दोनशे रुपयांचा मोबदला स्वीकारलेच्या परिस्थितीत मिळून आली. त्यानंतर फ्रीडम फर्म संस्थेमधील समाजसेविका फिर्यादी - शीतल पवार यांनी महात्मा गांधी पोलीस स्टेशन, मिरज येथे तक्रार दिली. सदर आरोपीवर भा.दं.वि.स. कलम ३७० आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर घटना शाबित करण्यासाठी सरकारपक्षातर्फे एकूण ०९ साक्षीदार तपासण्यात आले. सदर घटनेत पीडितेचा पुरावा शिक्षेसाठी महत्वाचा ठरला. सदर घटना शाबित करण्यासाठी  त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये फ्रीडम फर्म संस्थेमार्फत अॅड. श्रीकांत कदम यांनी सरकार पक्षास मदत केली.

सदरकामी, महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील अमोल पाटील, तसेच, पैरवी कक्षातील अशोक तुराई (श्रेणी पो.उ.नि.) व सुप्रिया भोसले यांनी मदत केली. त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलीसांचे सहकार्य मिळाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.