राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना
बाळासाहेब पाटील, सोमनाथ घार्गे, प्रवीणसिंह परदेशी यांचा समावेश
निकेश खाटमोडे पाटील वाशीमचे पोलीस अधीक्षक
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. बदली झालेल्यामध्ये बाळासाहेब पाटील, सोमनाथ घार्गे यांचा समावेश आहे. इचलकरंजीचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची वाशीमच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांच्या सहीने गुरुवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कोठे :
अजय के. बन्सल : पोलीस अधीक्षक, जालना ते पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य.
सिंगुरी विशाल आनंद : पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) ते पोलीस अधीक्षक, धुळे
बाळासाहेब पाटील : पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) ते पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
सोमनाथ घार्गे : पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ते सहायक पोलीस महानिरीक्षक (नि. व स.), पोलीस महासंचालक कार्यालय
रविंद्रसिंह एस. परदेशी : पोलीस अधीक्षक, परभणी ते उप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई.
श्रवण दत्त : पोलीस अधीक्षक, नंदुरबार ते अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर
मुम्मका सुदर्शन : पोलीस अधीक्षक, चंद्रपुर ते पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
धोडोंपत एस. स्वामी : पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) ते पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)
अनुज मिलिंद तारे : पोलीस अधीक्षक, वाशिम ते पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
अनुराग जैन : पोलीस अधीक्षक, नगरी हक्क संरक्षण : पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
अश्विनी सानप : पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे ते पोलीस अधीक्षक, नंदुरबार
तेगबीर सिंह संधु : अपर पोलीस अधीक्षक, मालेंगाव ते पोलीस अधीक्षक, जालना
राजकुमार शिंदे : पोलीस उप आयुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे
निकेश खाटमोडे : पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे ते पोलीस अधीक्षक, वाशिम
आयुष नोपानी : अपर पोलीस अधीक्षक, जालना ते पोलीस अधीक्षक, चंद्रपुर
पंकज कुमावत : अपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) ते पोलीस अधीक्षक, परभणी
निकेतन कदम : पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, नागपुर ते पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)
सुरज गुंजाल : अपर पोलीस अधीक्षक, परभणी ते अपर पोलीस अधीक्षक, मालेंगाव
गजानन राजमाने : पोलीस अधीक्षक, फोर्स वन ते पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
दत्ता लक्ष्मण तोटेवाड : अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), महाराष्ट्र राज्य यांचे स्टाफ ऑफिसर ते अपर पोलीस अधीक्षक, अमरावती
संदीप घुगे : उप आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई. ते पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.