Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"अशोक खरातने गुन्हा कबुल केलाच नाही", कॅप्टनच्या वकिलाचा दावा

"अशोक खरातने गुन्हा कबुल केलाच नाही", कॅप्टनच्या वकिलाचा दावा 

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आज अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याचा पोलीस कोठडीतला मुक्काम १३ एप्रिलपर्यंत वाढला आहे. अशोक खरात विरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात ही पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सुनावणी सुरू असताना अशोक खरातच्या वकिलाने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. अशोक खरातने गुन्हा कबुल केला नसल्याचं त्याने कोर्टात सांगितलं. यापूर्वी अशोक खरातने आपल्या गुन्ह्याच्या कबुली दिल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र हा दावा आरोपीच्या वकिलाने खोडून काढला आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांनी अशोक खरातच्या पोलीस कोठडीसाठी सांगितलेली कारण यापूर्वी देखील सांगण्यात आली होती, असा युक्तीवाद देखील अशोक खरातच्या वकिलाने मांडला.

अशोक खरातची पोलीस कोठडी मागण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं की, तिसऱ्या प्रकरणातील फिर्यादी महिला 7 महिन्याची गरोदर असताना आरोपी खरातने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीनं ईशान्यश्वर मंदिरात तिच्याकडून अघोरी पूजा करून घेतली. पीडित महिलेला मुलगाच होईल, असा विधी असल्याचं सांगितलं. धार्मिक विधीच्या नावाखाली पूजा केली. महेश कलंत्री नावाच्या व्यक्तीकडून अशोक खरातने नकली खडे आणून विकले. त्या व्यक्तीचा तपास करायचा आहे. तो महिलांना गुंगीचं औषध द्यायचा, ते काय आहे, याचा तपास करायचा आहे. यासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात केली.

अशोक खरातच्या वकिलाने कोर्टात केलेल्या युक्तीवादात म्हटलं की, यापूर्वी जी कारणं होती तिचं कारणं पुन्हा सांगितली जात आहेत. खडे, कातडी याबाबत ऑलरेडी तपास झाला आहे. आरोपीनं गुन्हा कबुल केला असं तपास अधिकारी म्हणतात, तर मग आता त्यांना काय शोधायचं आहे. विशेष म्हणजे खरातने गुन्हा कबुल केला नाही, असा खळबळजनक दावा आरोपीच्या वकिलाने केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.