Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात आता जुनी वाहनं दारात उभी करणे पडणार महागातभरावा लागेल दुप्पट कर, नियम लागू

महाराष्ट्रात आता जुनी वाहनं दारात उभी करणे पडणार महागात
भरावा लागेल दुप्पट कर, नियम लागू

मुंबई : खरा पंचनामा 

वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एप्रिल महिन्यांपासून राज्यात वाहतूक कराबद्दल नवीन बदल केले आहे. ७ एप्रिल २०२६ पासून जुन्या वाहनांवर पर्यावरण कर (Green Tax / Environment Tax) लागू केला आहे.

ज्यामुळे जर तुमच्याकडे १५ वर्ष जुने वाहन असेल तर त्यावर पर्यावरण कर लागू होणार आहे. हा कर ५ वर्षांसाठी लागू असणार आहे. म्हणजे, तुमची कार जर १५ वर्ष जुनी असेल तर पुढील ५ वर्षांसाठी तुम्हाला एकाच वेळी हा पर्यावरण कर भरावा लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारने 7 एप्रिल 2026 पासून राज्यात जुन्या वाहनांसाठी सुधारित पर्यावरण कर लागू केला आहे. 'महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम, २०२६' नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जर तुमच्याकडे BS-IV किंवा त्यापेक्षा जुनी कार असेल त्यावर हा कर द्यावा लागणार आहे. BS-VI वाहनांपेक्षा हा दुप्पट कर आहे. राज्य सरकारने वाहनांची दोन गटामध्ये विभागणी केली आहे. पहिली BS-VI आणि दुसरी BS-IV या जुन्या वाहनांवर कर आकारला जाणार आहे. जी वाहनं नवीन आहे, त्यांना कर कमी लागणार आहे. आणि जितकी जुनी वाहनं असतील त्यांच्यावर दुप्पट कर द्यावा लागणार आहे.

नवीन नियमानुसार, १५ वर्ष जुन्या वाहनांवर पुढील ५ वर्षांसाठी पर्यावरण कर भरणे गरजेचं आहे. तुम्ही जितकी वर्ष जुनी वाहनं वापरणार तितकं ते अगस्ती रवर्तित होणार आहे. त्यामुळे सरकारने स्क्रॅब पॉलि जुन्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालणे गरजेचं झालं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

मात्र, एकीकडे सरकारने प्रदुषणाचा मुद्दा पुढे करत जुन्हा वाहनांना दुप्पट कर आकारला आहे, तर दुसरीकडे कंस्ट्रक्शन आणि उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांना मात्र सवलत दिली आहे. क्रेन सारख्या वाहनावर कराची मर्यादा ही ३० लाखांपर्यंत केली आहे. यामध्ये मोठे प्रकल्प असतील तर खर्च कमी होईल आणि काम जास्त वााढेल. तसंच जर दुचाकी असेल तर BS-VI मॉडल असेल तर 2,000 रुपये कर लागणार आहे. तर BS-IV आणि आणखी जुनी कार असेल तर 4,000 रुपये कर आकारला जाईल. पेट्रोल वाहनांवर BS-VI असेल तर 3,000 रुपये आणि आणखी जुनी वाहनं असेल तर 6,000 रुपये कर आकारला जाणार आहे. तर डिझेल वाहन असेल तर BS-VI वर 3,500 रुपये आणि त्यापेक्षा जुनी कार असेल तर 7,000 रुपये कर भरावा लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.