आरोग्य शिबिराद्वारे डॉ. जे. व्ही. शेट्टी यांना आदरांजली; उद्या मोफत तपासणी
पूजा फडके
सांगली/कुपवाड : खरा पंचनामा
सांगलीतील नामांकित व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉ. जे. व्ही. शेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने 'आयुष सेवाभावी संस्था' आणि 'डॉ. जे. व्ही. शेट्टी परिवार' यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब आणि सुदर्शन आय हॉस्पिटल यांच्या तांत्रिक सहकार्याने गुरुवारी, १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:००यावेळेत डॉ. जे. व्ही. शेट्टी यांच्या घराजवळ, शिबिर पार पडणार आहे.
या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली रोटरी क्लबची मोबाईल व्हॅन. याद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या डोळ्यांची आणि विशेषतः मधुमेही रुग्णांच्या नेत्रपटलाची (Retina) जागेवरच अचूक तपासणी केली जाणार आहे.
मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचे विकार उद्भवण्याची शक्यता अधिक असते, हे लक्षात घेऊन अशा रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुष सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.