इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण : प्रा. जयंत आसगांवकर
कोल्हापूर : खरा पंचनामा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोल्हापूर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी शिक्षक समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक समितीने केले आहे.
गांधी जयंतीनिमित्त गेली नऊ वर्षे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत आहे. यंदाच्या स्पर्धेत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी डी.सी. कुंभार, शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, उपाध्यक्ष उमेश देसाई उपस्थित होते. उपायुक्त किरणकुमार धनवाडे म्हणाले, “मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक आहे.”
प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी सांगितले की, “शिक्षक समिती गेली नऊ वर्षे महाराष्ट्रात अभिनव असा इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम राबवत आहे. त्यामुळे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती दूर होण्यास मदत झाली आहे.” यावेळी सुधाकर सावंत, उमेश देसाई व संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. या समारंभास वसंत आडके, लक्ष्मण पोवार, शकील भेंडवडे, कुलदीप जठार, सुनील पाटील, विनोदकुमार भोंग, अजीम शेख, राजू खानापूरे, बी.आर. पिंपळकर, उमेश गाताडे, प्रियांका साजणे, तुषार भापकर, राजू चव्हाण, विठ्ठल दुर्गुळे, प्रसिद्धी प्रमुख संदीप जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन उमर जमादार यांनी केले तर आभार सरचिटणीस संजय कडगावे यांनी मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.