Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही"

"प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही"

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

अचानक चार दिवसापूर्वी आशाताईंचं दुर्दैवी निधन झालं, त्यामुळे कार्यक्रम रद्द होईल असे वाटले, पण मंगेशकर कुटुंबिय आणि ट्रस्ट यांनी विचार केला की, आशाताई हे त्यांचं आयुष्य उत्सव आहे असं जगल्या.

माझ्या मरणाचं दुःख करु नये असं सांगणाऱ्या आशाताई होत्या. अशा परिस्थितीमध्ये जर अशाताईंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ठरलेल्या दिवशी आणि त्याचवेळी कार्यक्रम झाला पाहिजे हा निर्णय घेतल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते 'लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'चे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्ह, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, विश्वस्त उषा मंगेशकर, आनंद भोसले, आदिनाथ मंगेशकर, लता मंगेशकर फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनजंय केळकर यांनी लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या उभारणीचे टप्पे, सुविधा आणि फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. त्यावेळी केळकर यांनी रुग्णालयात आलेले प्रमुख पाहुणे आणि घडणाऱ्या योगायोगाचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावही देशाच्या राजकारणात. दिल्लीत गाजणार, असे भाकीत वर्तवले. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी प्रतिक्रिया दिली. केळकर म्हणाले जो इथ येतो तो मोठा होतो, ज्यावेळेस इथं आलो होते त्यावेळेस मी प्रदेशाध्यक्ष होतो. मी आता मुख्यमंत्री झालो आहे, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे, त्यामुळं आता पेंडिंग काही नाही त्यावेळेस आशीर्वाद मिळाला आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंगेशकर कुटुंबीयांनी केलेली संगीत सेवा आपल्याला माहिती आहे. मात्र देशभक्तीने जगणारे कुटुंबही आपल्याला पाहायला मिळालं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी या कुटुंबाचे नाते होते. त्यांनी जवळून त्यांना बघितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशाच्या प्रत्येक संकटात मंगेशकर कुटुंबीय होते. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल सेवा करते ते थक्क करणारे आहे. मंगेशकर कुटुंबियांनी कधीही सेवेचा सौदा केला नाही तर सेवाभाव कायम ठेवून या ठिकाणी ही सगळी एवढी मोठी इमारत उभारी उभी केली आहे. लाखो लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम केलं.

सगळ्या डॉक्टरांच्या कामाबद्दल मला आदर आहे. पण अनेकदा अडचणी आल्या तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सेवा केली जाते. पु ल देशपांडे लतादीदींनी बद्दल असं म्हणाले होते की मला जर विचारलं तर असा देव आहे का? तर मी म्हणेन मी आकाशातला देव पाहिला नाही, मात्र चंद्र सूर्य आहे आणि लतादीदींचा सूर आहे, लता आशा याचा सुर सूर्य पृथ्वीतलावर आहे तोवर त्यांचा सूर ऐकायला येईल, सुरांची सेवा त्यांनी केली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

आशाताईंची संकटात सकारात्मकता पहिली जिवंतपणा ठासून भरला होता, कधीही निगेटिव्ह नव्हत्या. 9691 व्या वर्षी कॉन्सर्ट करत होते. जगात दुसऱ्या आशाताई निर्माण होणं शक्य नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. या हॉस्पीटल मध्ये व्याप पाहिला तर सगळे केले आहे. पूर्ण सेवेकरता लागणारे सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. इतकं चांगले कार्य आपण करत आहात आम्ही या ठिकाणी कार्य हाती घेतले पाहिजे. या ठिकाणी येण्याचा रस्ता थेट आणि मोठा रस्ता कसा करता येईल ते पाहीले पाहिजे. धर्मादाय संस्थांना आपण काही सूट देता येईल का? हे येणाऱ्या काळात आपण बघू आपलाही या निमित्ताने खारीचा वाटा यामध्ये देऊ शकू.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.