राज्यातील ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील चार बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गुरूवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मागील दोन आठवड्यांत राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ही चौथी वेळ आहे.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात देखील बदल्यांची परंपरा कायम राहिली आहे. बुधवारी आणि गुरूवारी सलग दोन दिवशी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
१) श्री जी. श्रीकांत (IAS: RR:2009) अभियान संचालक, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांची विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२) छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त श्री जितेंद्र पापळकर (IAS:SCS:2010) यांची मुंबई येथे जीएसटी सहआयुक्त म्हणून बदली झाली आहे.
३) श्री गंगाथरण डी. (IAS: RR:2013) यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४) श्री जगदीश मिनियार (IAS: RR:2015) मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची, महिला व बालक, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.