Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जेवणास नकार दिला, पत्नीला संताप अनावर; पतीला थेट चाकूने भोसकले

जेवणास नकार दिला, पत्नीला संताप अनावर; पतीला थेट चाकूने भोसकले

वडोदरा : खरा पंचनामा 

जेवणास नकार दिल्याने संतापलेल्या पत्नीने चाकूने भोसकून पतीची हत्या केल्याची धक्कदायक घटना वडोदरा येथे उघडकीस आली आहे. कुंभारवाडा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अमित देवीपूजक असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी आरोपी पत्नीला अटक करत तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अमित मजुरीचे काम करायचा. सोमवारी दुपारी आरोपी पत्नी मंजूने अमितला जेवण वाढले. अमितने हे जेवण जेवण्यास नकार दिला. यामुळे मंजू नाराज झाली आणि दोघांमध्ये वाद झाला. सुरवातीला रागाच्या भरात अमितने मंजूच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर मंजूने धारदार शस्त्राने अमितच्या छातीत आणि डोक्यात वार केले. यात अमितचा जागीच मृत्यू झाला.

शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मंजूला अटक केली. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. पती-पत्नीमध्ये अन्य कारणातून वाद होता का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.