IPS ची नोकरी सोडून कमळ हाती घेत निवडणूक लढवली; पण गुजरातच्या मतदारांनी पाडलं!
अहमदाबाद : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपची त्सुनामी पाहायला मिळाली. पण काही ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लागल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPS ची नोकरी सोडून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मनोज निनामा यांचा पराभव झाला आहे. राज्यात भाजपची त्सुनामी असतानाही ते पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार राहिलेल्या व भाजपत गेलेल्या भूपत भयाणी यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.
निनामा हे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी होते. ते ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, मनोज निनामा यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणात येण्यासाठी त्यांनी आयपीएसची नोकरी सोडली.
यानंतर भाजपनं त्यांना शेवटच्या क्षणी अरावलीतील शामलाजी तालुक्यातील ओध जिल्हा पंचायतीमधून तिकीट दिलं होतं. निनामा यांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवली. मात्र तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर गुजरातच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला.
मनोज निनामा यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी आणि जीवलग मित्र पी. सी. बरंडा यांचा मोठा प्रभाव आहे. बरंडा यांनीही पोलीस विभागात बराचकाळ सेवा दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी राजकारणात एण्ट्री केली. अन्न आणि पुरवठा, ग्राहक मंत्रालयाचा कारभार त्यांनी पाहिला. ते अरावली जिल्ह्याच्या भिलोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बरंडा यांच्याच पावलावर पाऊल टाकत निनामा यांनी राजकारणात प्रवेश केला. यानंतर भाजपचे सेजल गोहेल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गोहेल यांनीच निनामा यांचा पराभव केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.