Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नीलम गोन्हे अन् बच्चू कडूंच्या नावाला शिंदे शिवसेनेत विरोध

नीलम गोन्हे अन् बच्चू कडूंच्या नावाला शिंदे शिवसेनेत विरोध

मुंबई : खरा पंचनामा 

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. परंतु, प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक लागली असून एकूण १० जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. १२ मे रोजी मतदान पार पडणार असून त्यादिवशीच निकाल जाहीर होणार आहे. परंतु, महायुतीत उमेदवारीवरून बरीच रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. भाजपने ६ जागांसाठी १५ नावे निश्चित केली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडे २, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) १ जागा मिळत आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत सध्या दोन नावांवरून रणकंदन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद उपसभापती नीलम गोहेंच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी, 'त्या पुन्हा सभागृहात येतील,' असे बोलून गेले होते. त्यामुळे गोहेंचं तिकीट 'फिक्स' असल्याचं बोललं जात होते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 'प्रहार' जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता आणि ते सोबत गुवाहटीला देखील गेले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव झाला.

आता, अलीकडेच एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची भेट झाली आणि यावेळी बच्चू कडूंना विधानपरिषदेवर संधी देऊ, अशी ऑफर दिली असल्याचं वृत्त आहे. परंतु, बच्चू कडूंचा 'प्रहार' जनशक्ती ही संघटना शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवली आहे. आता बच्चू कडू काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलेलं आहे. यातच नीलम गोऱ्ह आणि बच्चू कडूंच्या नावाबद्दल शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.

गोहेंच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतील नेत्यांचा विरोध आहे. तर बच्चू कडूंचा शिवसेनेशी काय संबंध? असा प्रश्न पक्षातील नेत्यांनी उपस्थित केला आहे. कडूंना विधान परिषदेवर जायचे असल्यास 'प्रहार' संघटना शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करावी, ही अट कायम असल्याचं बोललं जात आहे. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेवर देखील नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी. हा नवा पॅटर्नच राबवण्यात यावा, असा सूर शिंदेंच्या शिवसेनेत उमटत आहे. यावर उपमुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

भाजपने ५ जागांसाठी १५ नावे निश्तित केली होती. त्यानंतर त्यात आणखी ११ नावांची भर पडली. प्रदेशवार प्रतिनिधत्त्व देण्यावर तसेच, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्त्व असे या वेळेचं सूत्र आहे. या आधारावर जुन्या जाण्यात पण पक्षासाठी पुढची किमान १५ वर्षे काम करू शकणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. काँग्रेसचा त्याग करून भाजप आलेल्या प्रज्ञा सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उर्वरित पाच जागांवर चर्चा होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.