एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द, पोलीस आयुक्तांचे आदेश
पुणे : खरा पंचनामा
शस्त्र परवान्यांची पडताळणी सुरू करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी ४० शस्त्र परवाने (वेपन लायसन्स) रद्द केले. शस्त्र परवान्याचे नूतनीकरण न करणे, शस्त्राची गरज नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी एका दिवसात ४० शस्त्र परवाने रद्दे केले. अमितेश कुमार यांनी दोन वर्षांपूर्वी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.
गेल्या दोन वर्षांत पोलीस आयुक्तांनी २८९ परवाने रद्द केले असून, शस्त्र परवाना मिळविण्यासाठी दाखल केलेले ४७६ अर्ज फेटाळून लावले. पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवान्यांची पडताळणी केली. स्वसंरक्षणासाठी परवाना हवा असे कारण देऊन अनेकांनी पिस्तूल परवाने मिळवले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी अशा परवानाधारकांची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत शस्त्र किंवा पिस्तूल परवाना असलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची धमकी देण्यात आली नसल्याचे उघडकीस आले. अनेकांनी समाजात प्रभाव पाडण्यासाठी परवाने घेतल्याचे उघडकीस आले.
पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवाना प्रक्रियेवर विशेष लक्ष दिले आहे. ज्याने परवाना मिळविला आहे. त्याची पार्श्वभूमी, सुरक्षा याबाबतची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी गेल्या दोन वर्षांत २८९ शस्त्र परवाने (वेपन लायसन्स) रद्द केले. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी दाखल केलेले ४७६ अर्ज फेटाळून लावले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.