Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुखांना ९२ मतांनी हरवलं मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल

स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुखांना ९२ मतांनी हरवलं 
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल 

बीड : खरा पंचनामा 

मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या चुरशीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

मस्साजोग ग्रामपंचायतीची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. गावातील राजकीय वर्चस्वासाठी दोन्ही गटांनी जोरदार प्रचार केला. अखेरीस ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत त्यांना स्पष्ट बहुमताने विजयी केले. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळत आणि जल्लोष करत विजय साजरा केला.

स्वरूपानंद देशमुख हे गावातील अनुभवी कार्यकर्ते मानले जातात. यापूर्वी त्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा अवघ्या ९ मतांनी पराभव झाला होता. तसेच "ग्रामपंचायतीत अनेक वर्ष काम केले असून विविध योजना राबवल्या आहेत. माझे कामच माझी ओळख आहे. " असे त्यांनी प्रचारादरम्यान सांगितले होते.

मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निघृण हत्या झाली होती. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली होती आणि सरपंचपद रिक्त झाले होते.

या पार्श्वभूमीवर गावात सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले होते. संतोष देशमुख यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी काही ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आली होती.

संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या सरपंचपदासाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांना बिनविरोध निवडून देऊन दिवंगत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशी भावना व्यक्त केली जात होती. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि विजयी झाले.

दरम्यान, या निवडणुकीसाठी ७ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील एकूण ८८ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा हा भाग होता. २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज २९ एप्रिल रोजी मतमोजणी झाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.