काँग्रेस नेत्याच्या वाढदिवसाला खाकी वर्दीत भाषण
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप
नांदेड : खरा पंचनामा
खाकी वर्दी अंगावर असताना एका पोलीस निरीक्षकाने काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाऊन भाषण ठोकले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांचा हा प्रताप आहे. त्यांच्या भाषणाची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली.
काँग्रेसचे स्थानिक नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेतर्फे सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात हजेरी लावत अंगावर खाकी वर्दी असताना या महाशयांनी भाषण ठोकले.
भाषणाच्या सुरुवातीलाच मुंडे यांनी रामदास पाटील यांच्या नावाचा जयघोष केला. जयघोषाचा आवाज 2029 च्या निवडणुकीपर्यंत टिकून राहिला पाहिजे असे देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे म्हणाले. मतदार संघाची पुनर्रचना जरी झाली तरी तुमचा अश्वमेध कोणी मायचा लाल रोखू शकणार नाही असे मुंडे भावनेच्या भरात म्हणाले.
रामदास पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये आले, पण ते जेव्हा काँग्रेसकडून निवडून येतील तेव्हा मंत्रीही होतील, असे भविष्यही मुंडे यांनी वर्तवले. हा कार्यक्रम फक्त काँग्रेस पक्षाचा नाही हा कार्यक्रम तुमच्या सर्वांचा आहे, असेही मुंडे म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी त्यांची चांगली नाळ आहे, म्हणून भविष्यात त्यांना कोणी रोखू शकणार नाही, असे म्हणत आपल्या भाषणाच्या शेवटीही मुंडे यांनी रामदास पाटील जय हो असा जयजयकार केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.