Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांपेक्षा सुनेत्रा पवार श्रीमंत!

शरद पवारांपेक्षा सुनेत्रा पवार श्रीमंत!

पुणे : खरा पंचनामा 

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून काँग्रेसने उमेदवार दिल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

सोमवारी सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे सुनेत्रा पवार यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा झाला आहे. सुनेत्रा पवार या सासरे शरद पवार यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. दुसरीकडे सुनेत्रा पवार या बारामती विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा झाला आहे. बारामतीच्या सुनबाई सुनेत्रा पवार यांच्याकडे सासरे शरद पवार यांच्यापेक्षा अधिक संपत्ती आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे एकत्रितपणे सुमारे 121.79 कोटी इतकी संपत्ती आहे. सुनेत्रा पवार यांच्या संपत्तीमध्ये जमिनीत सर्वाधिक गुंतवणूक केल्याचे दिसून येते. सुनेत्रा पवार यांच्याकडे 67.67 कोटींची स्थावर मालमत्ता आहे ज्यामध्ये बारामतीमधील शेतजमीन तसेच व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे टोयोटा कॅमरी, इनोव्हा सारख्या आलिशान गाड्या तसेच ५.६ ट्रेलर, ट्रॅक्टर आहेत. त्यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य २३. २५ कोटी इतके आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांच्याकडे एकूण 61 कोटींची संपत्ती आहे. आपल्या संपत्तीत शरद पवार यांनी सर्वाधिक गुंतवणूक ही श शेअर्स आणि मुदत ठेवीत जास्त केली असल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांच्याकडे ४४.७१ कोटी रुपयांची एकूण 'जंगम' मालमत्ता आहे. त्याचबरोबर पत्नी प्रतिभा यांच्या नावे २७.७७ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. पवारांवर ४९ लाखांचे कर्ज आहे.

दरम्यान, संपूर्ण पवार फॅमिलीत सुप्रिया सुळेंकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचे दिसून येते. सुप्रिया सुळेंकडे 167 कोटींची संपत्ती आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे अब्जाधीश असून, त्यांच्याकडे एकूण १६६.५ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.